GRSE Bharti 2024 | गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड येथे 236 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

GRSE Bharti 2024  मित्रांनो आज आपण गार्डन रिच शिप बिल्डर्स एड इंजिनियर्स लिमिटेड येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून 236 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ट्रेड अप्रेंटिस ( आयटीआय ), ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर ), पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, एचआर ट्रेनी या पदाकरिता इच्छुक असलेले उमेदवार भरती करिता अर्ज करू शकतात. 17 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे आहेत. गार्डन रिच शिप बिल्डर्स एड इंजिनियर्स लिमिटेड यांच्या भरती संदर्भात अधिक माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अधिक माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 236 रिक्त जागा गार्डन रिच शिप बिल्डर्स एड इंजिनियर्स लिमिटेड  यांच्याद्वारे भरण्यात येणार आहेत.
  • गार्डन रिच शिप बिल्डर्स एड इंजिनियर्स लिमिटेड  येथील भरती मधून ट्रेड अप्रेंटिस ( आयटीआय ), ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर ), पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, एचआर ट्रेनी  या पदासाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई येथील भरती

GRSE Bharti 2024
GRSE Bharti 2024

GRSE Bharti 2024 | गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.

  • ट्रेड अप्रेंटिस ( EX – ITI ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT) ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. या पदासाठी फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, मशिनिस्ट, पाईप फिटर, कार्पेंटर, ड्राफ्ट मॅन ( मेकॅनिकल ), प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, मेकॅनिक ( डिझेल ), फिटर स्ट्रक्चरल, सेक्रेटरी असिस्टंट ( इंग्लिश ), मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम, मेकॅनिक रिप्रेझेंटेशन अँड एअर कंडिशन या शाखेमधून आयटीआय उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
  • ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे किंवा त्याच्या समतुल्य पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. या पदाकरिता आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आयटीआय परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. सदरील भरती मधून फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, पाईप फिटर, मशिनिस्ट या शाखेतील उमेदवारांना काम मिळणार आहे.
  • पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकी पदवी पूर्णवेळ अभ्यासक्रमातून उत्तीर्ण केलेली असावी. यामध्ये उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिविल या शाखा मधून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे.
  • तंत्रज्ञान अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकी पदवी किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेमधून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिविल या शाखेची पदवी किंवा पदविका उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी.
  • एचआर ट्रेनि या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून दोन वर्षे पूर्णवेळ अभ्यासक्रमातून 60% गुणांसह एमबीए / पोस्ट ग्रॅज्युएट पदवी / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा समतुल्य पदवी ह्युमन रिसोर्स/ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट / पर्सनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रियल रिलेशन / सोशल वर्क / लेबर वेल्फेअर या शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • ट्रेड अप्रेंटिस ( EX-ITI ) या पदाकरिता 90 जागा रिक्त आहेत. ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर ) या पदाकरिता 40 जागा रिक्त आहेत. पदवीधर अप्रेंटिस या पदाकरिता एकूण 40 जागा आहेत. तंत्रज्ञ अप्रेंटिस पदाकरिता 60 जागा रिक्त आहेत. HR ट्रेनी या पदासाठी 06 जागा रिक्त आहेत.
  • ट्रेड अप्रेंटिस ( EX – ITI ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 ते 25 वर्षापर्यंत असावेत.
  • ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 ते 20 वर्षापर्यंत असावे.
  • पदवीधर अप्रेंटिस या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 ते 26 वर्षापर्यंत असावे.तंत्रज्ञ अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 ते 26 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • एचआर ट्रेनी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 26 वर्षापर्यंत असावे.
  • वरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2024 रोजी पूर्ण झालेले असावे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येणार आहे.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण कोलकत्ता आणि रांची असणार आहे.
  • गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात क्र.1   जाहिरात क्र.2
  • गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड येथील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

GRSE Bharti 2024 | गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

  • गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची वेबसाईट उमेदवारांना जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे नाहीत. ऑफलाईन अर्ज करण्याची कोणतीही सुविधा गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी कंपनीच्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे नाहीत.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी जाहिरातीत देण्यात आलेल्या ऑनलाईन वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही माध्यमांद्वारे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे नाहीत. उमेदवारांनी अर्जामध्ये माहिती लिहीत असताना संपूर्ण माहिती आणि बरोबर लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • 17 नोव्हेंबर 2024 सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाहीत.
  • सदरील भरतीसाठी जा उमेदवारांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. आशा उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

GRSE Bharti 2024 | गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत. इतर कोणत्याही उमेदवारांना सदरील भारतीच्या प्रक्रियेमध्ये न अर्ज करता प्रवेश देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यावी.
  • गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड भरती करिता भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
  • गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार करू नये. अनुचित प्रकार करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल. त्याचबरोबर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनी संदर्भात अधिक माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे.

Leave a Comment