NFR Bharti 2024 | पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे येथे विविध पदांसाठी भरती.

NFR Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण पूर्वोत्तर फ्रंटइयर रेल्वे येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणारा भरती मधून एकूण 5647 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ‘ अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) ‘ या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. 3 डिसेंबर 2024 भरती करिता ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पूर्वोत्तर फ्रंटइयर रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख वाचावा.

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती.

NFR Bharti 2024 | पूर्वोत्तर फ्रंटइयर रेल्वे येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.

NFR Bharti 2024
NFR Bharti 2024
  • अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी NCVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेमधून मशीनिस्ट/मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ कारपेंटर/डिझेल मेकॅनिक/ पेंटर/ इलेक्ट्रिशियन/टर्नर/ रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक/ लाइनमन/ मेसन/ फिटर स्ट्रक्चरल/मशीनिस्ट (ग्राइंडर)/ इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स यापैकी कोणत्याही शाखेमधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
  • सदरील NFR Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 3 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असावे. अर्ज करणाऱ्या SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
  • सदरील NFR Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे.
  • या भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याकरिता इथे क्लिक करा.
  • पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • 4 नोव्हेंबर 2024 रोजी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 4 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. 3 डिसेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेले आहे.
  • प्रशिक्षणार्थी कायदा 1961 प्रमाणे नॉर्थ ईस्ट फ्रंट इयर रेल्वे यांच्याकडून 5647 रिक्त जागा भरण्यात आलेल्या आहेत. इच्छुक असलेले उमेदवार सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आशा उमेदवारांनी RRC / NFR’S च्या वेबसाईट ला भेट द्यायचे आहे. यासाठी उमेदवारांनी www.nfr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे. त्यानंतर उमेदवारांनी General Info वरती क्लिक करायचे आहे. Railway Recruitment Cell GHY या सेक्शन वर क्लिक करायचे आहे.
  • सदरील भरतीसाठी मिळालेल्या अर्जान मधून योग्य उमेदवारांची निवड त्यांना मिळालेल्या गुणांनुसार केले जाणार आहे. त्याप्रमाणे उमेदवारांची निवड करण्यामध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही प्रकारची सेंट्रलाइज मेरिट लिस्ट तयार केली जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • NFR Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवार युनिट व्हॉईस, ट्रेड वाईस आणि कम्युनिटी मेरिट पोझिशन नुसार योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी 10 वी मध्ये 50% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी ITI उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • लॅबोरेटरी टेक्निशियन ( पॅथॉलॉजी ) आणि लॅबोरेटरी टेक्निशियन ( रेडिओलॉजी ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 12 वी सायन्स मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दहावी मध्ये कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करत असताना उमेदवाराला मिळालेले 10 वी परीक्षा मध्ये आणि 12 वी परीक्षा मध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका विशिष्ट विषयाचे गुण पकडण्यात येणार नाहीत. त्याचप्रमाणे बेस्ट ऑफ फाईव्ह चे गुण पकडण्यात येणार नाहीत. सर्व विषयात मिळालेले गुण पकडले जातील.
  • NFR Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या दोन किंवा अधिक उमेदवारांना जर समान गुण मिळालेले असतील तर ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे आशा उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. जर कोणत्याही दोन उमेदवारांची जन्मतारीख सेम असेल तर आशा उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी 10 वी परीक्षा पहिल्यांदा उत्तीर्ण केलेली आहे. आशा उमेदवाराची निवड करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी असणाऱ्या एकूण रिक्त जागेच्या दीडपट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्याच उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी सुद्धा बोलावण्यात येणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्वतःचा संपूर्ण रिझ्युम आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सोबत असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज जमा केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला रजिस्ट्रेशन नंबर देण्यात येणार आहे. पुढील निवड प्रक्रियेच्या टप्प्यांमध्ये या रजिस्ट्रेशन नंबर चा उपयोग होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांनी स्वतःचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी निवड प्रक्रिया सुरू असताना बदलू नये. किंवा बंद करू नये. या मोबाईल नंबर द्वारे आणि ईमेल आयडी द्वारे उमेदवारा सोबत संभाषण साधले जाणार आहे.
  • NFR Bharti 2024 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. शेवटच्या क्षणी अर्ज करायला खूप जास्त गर्दीमुळे वेबसाईट वरती लोड येऊ शकतो आणि सर्वर इशू मुळे अर्ज भरला जाऊ शकत नाही. त्यासाठी उमेदवारांनी त्याच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वीच आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • सदरील NFR Bharti 2024 भरती मधील प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. त्याचबरोबर मेडिकल विभागातील प्रशिक्षणार्थी चा कार्यकाल एक वर्ष तीन महिन्याचा असणार आहे.
  • वरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10 वी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे आयटीआय उत्तीर्ण केलेले प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे आयटीआय उत्तीर्ण चे फायनल मार्कशीट असणे गरजेचे आहे. 12 वी परीक्षा सायन्स मध्ये उत्तीर्ण केलेल्याचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फक्त संबंधित कोर्स उत्तीर्ण केलेला असणे गरजेचे नाही. तर त्याच बरोबर उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये आवश्यक गुण उत्तीर्ण केलेले असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अपंग उमेदवारांकरिता वयामध्ये 10 वर्षे सूट असणार आहे. माजी सैनिकां करिता किंवा त्यांच्या अपत्यां साठी या भरतीमध्ये आरक्षण देण्यात आलेली आहे.
  • ज्यावेळेस उमेदवाराचे ऑनलाईन अर्ज भरून होतील त्यानंतर उमेदवाराला पैसे भरण्याची लिंक देण्यात येईल. त्यावरून उमेदवारांनी अर्जाची फी भरायची आहे.
  • एकदा पेमेंट पूर्ण भरून झाल्यानंतर उमेदवाराला मूळ वेबसाईटवर रीड डायरेक्ट करण्यात येणार आहे. जर कोणत्याही उमेदवाराला पेमेंट पूर्ण झाले का नाही तपासायचे असेल तर उमेदवारांनी व्हेरिफाय पेमेंट वरती क्लिक करायचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50,000 पेक्षा कमी असेल तर अशा उमेदवाराचा अर्ज EBC मधून करण्यात येईल. आणि अशा उमेदवाराला परीक्षा शुल्कामध्ये सूट मिळेल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता कास्ट सर्टिफिकेट चा अर्ज जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेला आहे. ओबीसी सर्टिफिकेट चा फॉरमॅट ओबीसी उमेदवारांकरिता जाहिरातीचा शेवट देण्यात आलेला आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता आवश्यक मेडिकल सर्टिफिकेट चा फॉरमॅट सुद्धा जाहिरातीच्या शेवट देण्याला आलेला आहे. त्यानुसार उमेदवारांनी मेडिकल सर्टिफिकेट बनवावे.

Leave a Comment