Gokhale Education Society Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत आठ जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरती मधून आठ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती करिता अर्ज पोहोचण्याचे अंतिम दिनांक अर्ज प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांमध्ये म्हणजेच 25 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. सदरील भरती मधून ” प्राचार्य ” पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवायचा आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- आठ रिक्त जागा भरण्याकरिता गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती निघालेली आहे.
- ” प्राचार्य ” पदासाठी गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती निघालेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर भरती
Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी येथील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.
- ” प्राचार्य ” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी 55% गुणांनी किंवा त्याच्या समतुल्य ग्रेड ने उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएचडी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांवर कार्यरत असताना 15 वर्ष विद्यापीठ, कॉलेज, शैक्षणिक संस्था येथे शिकवण्याचा किंवा रिसर्च संदर्भातील अनुभव असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कमीत कमी 10 रिसर्च पेपर पब्लिश केलेले असणे गरजेचे आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 500 शुल्क असेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये शुल्क असेल.
- गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” सेक्रेटरी, गोखले एज्युकेशन सोसायटी, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक – 422005 (M.S.). ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वेतन मिळेल.
- SC / ST & OBC प्रवर्ग आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना पदव्युत्तर पदवी मध्ये 5% मार्क्स सूट देण्यात आलेली आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार महिला आणि दिव्यांग उमेदवारांना आरक्षण देण्यात येईल.
- जे उमेदवार गोखले एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी आहेत असे उमेदवार सुद्धा सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये कोणत्याही उमेदवाराला शैक्षणिक कालखंडामध्ये खंड पडलेला असेल. तर त्याबाबत नमूद करावे.
- अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवाराला इंग्रजी आणि मराठी भाषा येत आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना संस्थेच्या इतर महाविद्यालयांमध्ये बदली देण्यात येईल.
- गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील नियम ओळखा.
- गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत होणाऱ्या भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- सदरील Gokhale Education Society Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्याद्वारे राबविण्यात आलेली नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःच्या पदवीत्तर पदवी चे प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र, रिसर्च पेपर चे पुरावे यासंदर्भातील संपूर्ण माहिती सत्य सादर करायचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- 25 ऑक्टोबर 2024 ही ऑफलाइन भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार पात्र असतील.
- गोखले एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या किंवा भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
- Gokhale Education Society Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवारां वरती गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरती मधून उमेदवारांची निवड कशा पद्धतीने करायची याबाबत संपूर्ण अधिकार गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्याकडे राहतील.
- गोखले एज्युकेशन सोसायटी त्यांच्याकडून जाहीर केलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी संदर्भात माहिती खालील प्रमाणे आहे.
- 19 फेब्रुवारी 1918 रोजी नामदार गोपाल कृष्ण गोखले यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिवशी गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस या संस्थेचे प्राचार्य टी. ए . कुलकर्णी सर होते. ते एक समाज सुधारक होते. आज या संस्थेला 100 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. या संस्थेच्या एकूण 140 पेक्षा जास्त शाखा झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, नाशिक, ठाणे- पालघर येथील 1.25 लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. समाजामध्ये उत्कृष्ट नागरिक शिक्षणातून आणि प्रशिक्षणातून घडावा यासाठी काम करणाऱ्या संस्थांपैकी गोखले एज्युकेशन सोसायटी ही एक खूप जुनी संस्था आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शिक्षणातून आणि उच्च शिक्षणातून घडवून आणण्याकरिता गोखले एज्युकेशन सोसायटी कटिबद्ध आहे.
- अभ्यासक्रम विकसित करणे, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेणे, विद्यार्थ्यांमध्ये सामर्थ्य आणि आत्मविश्वास वाढवणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे उद्दिष्ट संस्थेला टेक्निकल नॉलेज द्वारे सिद्ध करायचे आहे. ही संपूर्ण सोसायटी शिक्षकांद्वारे चालवण्यात येते. सिनेट सदस्यांपैकी बरेच सदस्य या संस्थेचे शिक्षक आहेत. सोसायटीच्या सर्व महाविद्यालयांना NAAC मान्यता मिळालेले आहे. या संस्थेचे सर्व महाविद्यालय, विद्यालय, पूर्व प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा यांना ISO : 9001 : 2015 नामांकन प्राप्त झालेले आहे.
- गोखले एज्युकेशन सोसायटी हे एक प्रसिद्ध सोसायटी आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना केजी ते पीजी पर्यंत संपूर्ण शिक्षण देण्यात येते. संशोधन आणि विकासासाठी या संस्थेमध्ये शिक्षकांसाठी पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. पीएचडी प्रोग्रॅम करिता संस्थेमध्ये अत्याधुनिक लॅबोरेटरी, लायब्ररी यांसारख्या सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत.
- M.Phil / Ph.D या पदवी करिता संस्थेमध्ये कला, विज्ञान आणी वाणिज्य शाखा उपलब्ध आहेत. कला शाखेमध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी हे विषय आहेत. पदव्युत्तर पदवी करिता M.Sc , M.Com , Management / MBA , M.A या पदवी उपलब्ध आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, मायक्रो बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, अनलिटिकल केमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्री, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर एप्लीकेशन या विषयांमधून M.Sc पदवी उत्तीर्ण करता येईल.
- कॉमर्स, कॉमर्स विथ ॲडव्हान्स कम्प्युटिंग, ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड बिझनेस, कॉम्प्युटर एप्लीकेशन, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट अकाऊंट अँड ऑडिटिंग, मार्केटिंग या शाखांमधून उमेदवाराला M.Com पदवी उत्तीर्ण करता येईल.
- मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस स्टडी, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, पर्सनल मॅनेजमेंट, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्स, फायनान्स या विषयांमध्ये उमेदवारांना MBA पदवी मिळवता येईल.
- मराठी, हिंदी, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, जर्नालिझम, सायकॉलॉजी, जॉग्रफी, इतिहास, या विषयांमधून MA पदवी मिळवता येईल.
Gokhale Education Society Bharti 2024 | गोखले एज्युकेशन सोसायटी संदर्भात महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे.
- 25 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- 25 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- संबंधित Gokhale Education Society Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी.