DCC Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून लिपिक आणि शिपाई या दोन पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. सदरील भरती मधून लिपिक पदाकरिता 261 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर शिपाई पदाकरिता 97 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 19 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी सदरील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खालील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 358 रिक्त जागांकरिता जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून भरती निघालेली आहे.
- जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून लिपिक आणि शिपाई या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
महिला व बालकल्याण विभाग येथे भरती.
DCC Bank Bharti 2024 | जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून एमएस-सीआयटी प्रमाणपत्र मिळवलेले असावे.
- जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेली असेल किंवा बँकेमध्ये लिपिक किंवा वरिष्ठ श्रेणी मध्ये काम करत असेल किंवा त्या कामाचा उमेदवाराकडे अनुभव असेल तर अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी आणि मराठी टंकलेखन येत असेल. आणि या टंकलेखन याबाबत उमेदवाराने परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र मिळवलेले असेल तो आशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- शिपाई या DCC Bank Bharti 2024 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- सदरील DCC Bank Bharti 2024 भरती करिता 8 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला झालेली आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांना सामोरे जावे लागणार आहे. ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत यांचा समावेश असणार आहे.
- ऑनलाइन परीक्षेमध्ये चे उमेदवार पात्रा होतील अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी मुलाखती पूर्वी घेण्यात येणार आहे. या मुलाखती पूर्वी घेण्यात येणाऱ्या कागद पडताळणीसाठी सर्व उमेदवारांनी संपूर्ण कागदपत्र सहित उपस्थित राहणे गरजेचे आहे. जे उमेदवार सदरील कागदपत्र पडताळणी करिता राहतील अशा उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.
- घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा करिता चंद्रपूर जिल्ह्यातील आणि चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुक्यांच्या ठिकाणचे परीक्षा केंद्र असणार आहे.
- सदरील भरती मध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्याचा पूर्णपणे अधिकार जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर यांच्याकडे असणार आहे. जर कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला तर अशा प्रकारच्या बदलासंदर्भात माहिती वर्तमानपत्र आणि बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. भरतीसाठी अर्ज केलेल्या कोणत्याही उमेदवाराला वैयक्तिक पत्राद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमांद्वारे वैयक्तिक पद्धतीने सांगण्यात येणार नाही.
- सदरील DCC Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना सर्व उमेदवारांनी स्वतःची माहिती अचूक भरावी.
- ऑनलाइन परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणारच आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना सोबत कागदपत्रे जोडू नयेत.
- या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
- शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे.
- जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.
DCC Bank Bharti 2024 | जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आवश्यक सूचना खालील प्रमाणे.
- जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर यांनी जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या वेबसाईट द्वारे सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर यांच्याकडून ऑनलाइन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धत अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज पत्राद्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या पत्त्यावर पाठवू नये.
- सदरील DCC Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पद्धतीने अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नये. त्यामुळे उमेदवाराचा अर्ज रद्द होऊ शकतो. उमेदवाराचा अर्ज जर रद्द झाला तर त्याला पूर्णपणे उमेदवार जबाबदार असेल.
- 19 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर येथील भरतीसाठी पद्धतीने अर्ज करण्यात करिता उमेदवारांनी बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. त्यामुळे उमेदवाराला अर्ज करण्याची पद्धत लक्षात येईल.
DCC Bank Bharti 2024 | जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आशा उमेदवारांमधून बँकेचा कर्मचारी निवडण्यात येईल. अर्ज न केलेल्या उमेदवारांना बँकेच्या भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही.
- सदरील बँकेच्या भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षा साठी येणाऱ्या, अर्ज पडताळणी करिता येताना, मुलाखती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदरील DCC Bank Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार करण्यात आला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा उमेदवारांना यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर यांच्या कोणत्याही भरतीमध्ये सामील होता येणार नाही.
- भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात 8 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून होणार आहे.
- सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर यांच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
DCC Bank Bharti 2024 | जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर येथील भरतीसाठी अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- 8 ऑक्टोबर 24 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत सदरील भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरू शकतात.
- दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सदरील भरतीसाठी परीक्षेचे ठिकाण जाहीर करण्यात येणार आहे.
- दिनांक 6 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाइन परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करायला सुरू होणार आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा 9 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर 2024 या तारखेला घेतली जाणार आहे.
- ऑनलाइन परीक्षेमधून पात्र झालेल्या उमेदवारांकरिता कागदपत्र पडताळणीची आणि मुलाखतीची दिनांक बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
- सदरील DCC Bank Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 560 रुपये असणार आहे.
- भरतीसाठी आवश्यक शुल्क ची भरणा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागणार आहे.
- DCC Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर येथील ज्या पदांसाठी अर्ज करणार आहे त्या पदांसंदर्भात बँकेकडून देण्यात आलेली पात्रता उमेदवारा द्वारे पूर्ण करण्यात आलेली पाहिजे.
- जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.