CSIR Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्यामार्फत होणाऱ्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 37 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 6 डिसेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात येणार आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. यासाठी देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 37 रिक्त जागांकरिता केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्याद्वारे भरती निघालेली आहे.
- तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञान या पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्याद्वारे भरतीचे आयोजन केलेले आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया येथे भरती.
CSIR Bharti 2024 | केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीएससी एग्रीकल्चर / हॉर्टिकल्चर किंवा समतुल्य पदवी कमीत कमी 60% गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे संबंधित कामाचा कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असावा. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी एग्रीकल्चर किंवा हॉर्टीकल्चर ही पदवी कमीत कमी 60% गुणांनी उत्तीर्ण करायला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे एक वर्षाचे फुल टाइम क्वालिफिकेशन असणे गरजेचे आहे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हॉर्टीकल्चर मधून डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. हा डिप्लोमा उमेदवारांनी दोन वर्षे पूर्णवेळ अभ्यासक्रमातून उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवारांनी 60% गुणांनी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा त्याचबरोबर संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असावा.
- तांत्रिक सहाय्यक- 2 (UR ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीएससी किंवा समतुल्य पदवी 60% गुणांनी उत्तीर्ण केले असावेत. त्याचबरोबर उमेदवाराकडे B.Lib.Sci ही पदवी असावी.
- तांत्रिक सहाय्यक – 3 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून मॅथेमॅटिक्स / स्टॅटिस्टिक्स या विषयांमधून बीएससी पदवी उत्तीर्ण केलेली असावी पदवी मध्ये उमेदवाराला कमीत कमी 60% गुण मिळणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. उमेदवाराला संगणक वापरायचे ज्ञान असावे. व्यावसायिक विकासाचे आणि व्यवस्थापनाचे उमेदवाराकडे ज्ञान असावे.
- तांत्रिक सहाय्यक – 4 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीएससी पदवी कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातून 60% गुणासह उत्तीर्ण केलेले असावे. मान्यताप्राप्त संस्थेमध्ये काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव.
- तांत्रिक सहाय्यक – 5 या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या शाखेमधून तीन वर्षे पूर्णवेळ अभ्यासक्रमातून उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दोन वर्षाचा अनुभव असावा.
- तांत्रिक सहाय्यक – 6 करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेमधून तीन वर्षे पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असणे गरजेचे आहे. उमेदवाराला डिप्लोमा मध्ये कमीत कमी 60% गुण मिळणे आवश्यक आहे. संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असावा.
- तंत्रज्ञ – 2 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. त्या उमेदवाराला दहावी मध्ये 55% गुण मिळालेले असणे गरजेचे आहे. सदरील उमेदवारांनी इलेक्ट्रिशियन / वायरमन या शाखेमधून ITI उत्तीर्ण केलेला असावा. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 वी परीक्षा 55% गुणांनी उत्तीर्ण केलेला असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे इलेक्ट्रिशन किंवा वायरमन कामाचा दोन वर्षाचा अनुभव असावा.
- तंत्रज्ञ – 3 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून सिविल ड्राफ्ट्समन या शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. किंवा उमेदवाराने ड्राफ्ट्समन म्हणून दोन वर्षे काम केलेला उमेदवाराकडे अनुभव असावा. किंवा उमेदवाराकडे शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये ड्राफ्ट्समन म्हणून तीन वर्षे काम केलेला अनुभव असावा.
- तंत्रज्ञान- 4 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून 55% गुणाने 10 वी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. त्याचबरोबर उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून मशिनिस्ट या शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
- तंत्रज्ञ – 5 या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा 55% गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या शाखेतून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या शाखेमध्ये दोन वर्षे काम केलेला अनुभव असावा.
- तंत्रज्ञ – 6 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 55% गुणांनी 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवारांनी आयटीआय लॅबोरेटरी असिस्टंट या शाखेमधून उत्तीर्ण केलेला असावा.
- तांत्रिक सहाय्यक या पदाकरिता एकूण नऊ जागा असणार आहेत. तंत्रज्ञान या पदासाठी एकूण 28 जागा असणार आहेत.
- तांत्रिक सहाय्यक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन मिळणार आहे. तंत्रज्ञ या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 19900 ते 63,200 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 28 वर्षे असणार आहे.
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- तांत्रिक सहाय्यक या पदाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- CSIR Bharti 2024 तंत्रज्ञ या पदाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
CSIR Bharti 2024 | केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा या संस्थे कडून देण्यात आलेली आहे. जाहिरातीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याच्या वेबसाईट देण्यात आलेले आहेत. त्यापैकी कोणत्याही वेबसाइटवर जाऊन उमेदवारांनी आपल्या अर्ज भरायचे आहेत.
- CSIR Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्याकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे इतर कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना संस्थेच्या पत्त्यावर स्वतःचे अर्ज पाठवायचे नाहीत. असे अर्ज पाठवल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- CSIR Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना त्या अर्जामध्ये कोणत्याही उमेदवारांनी कसल्याही प्रकारची चुकीची माहिती लिहू नये स्वतःच्या शैक्षणिक पात्रते आणि स्वतःच्या नागरिकत्व बद्दल सर्व उमेदवारांनी खरी माहिती लिहायची आहे. चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- 06 डिसेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करू नयेत कारण या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रणाली बंद करण्यात येणार आहे.
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरती करिता उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात समजून घेतल्यानंतरच सर्व उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे. जाहिरातीमध्ये काय काही त्रुटी असल्यास उमेदवार दिलेल्या संपर्कात क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
CSIR Bharti 2024 | केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरतीसाठी या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र ठरू शकतात.
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- सदरील CSIR Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे जर अनुचित प्रकार करण्यात आला तर आशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथील भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.