HAL Nashik Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथे 18 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

HAL Nashik Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण 18 जागांसाठी होणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स, नाशिक येथील भरती संदर्भात माहिती काळजीपूर्वक जाणून घेणार आहोत. 24 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता संस्थे कडून देण्यात आलेली अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. ‘ झोनल डॉक्टर्स ‘ या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती द्वारे करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे. आशा उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचावे.

  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथील भरती मधून 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • भरती मधून भरण्यात येणाऱ्या 18 जागा ‘ झोनल डॉक्टर्स ‘ या पदांकरिता भरल्या जाणार आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे नोकरीची सुवर्णसंधी.

HAL Nashik Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि भरती संदर्भातील अटी खालील प्रमाणे आहेत.

  • सदरील HAL Nashik Bharti 2024  भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे पदवी नंतर संबंधित क्षेत्रामध्ये काम केलेला चा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा. किंवा उमेदवारांनी MBBS पदवी उत्तीर्ण केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराची शिक्षण मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे प्रमाणित असावे. उमेदवाराकडे MCI चे वैध प्रमाणपत्र असावे.
  • सदरील HAL Nashik Bharti 2024  भरती मधून उमेदवाराची निवड ज्या झोन मध्ये होणार आहे. अशा दोन मध्ये उमेदवाराचे खाजगी हॉस्पिटल असणे गरजेचे आहे.
  • OPD च्या वेळेस डॉक्टरांनी समुपदेशनासाठी हजर राहणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या डॉक्टरांच्या ओपीडी चे टाइमिंग सकाळी आणि सायंकाळी असावे. जेणेकरून डॉक्टर HAL च्या OPD मधील पेशंट तपासू शकतील.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टर करता वय मर्यादा 65 वर्षापर्यंत असेल.
HAL Nashik Bharti 2024
HAL Nashik Bharti 2024
  • यावरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
  • जाहिरातीत दिलेल्या ऑफलाइन पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • ‘व्यवस्थापक (मानव संसाधन), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, विमान विभाग, ओझर टाऊनशिप पोस्ट ऑफिस, ता. निफाड, नाशिक-422 207’ या पत्त्यावर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे किंवा उपस्थित राहून जमा करायचे आहेत.
  • नाशिक मधील त्रिमूर्ती चौक, लेखानगर, पाथर्डी फाटा, द्वारका, रविवार करंजा, नाशिक रोड – 1, नाशिक रोड – 2, सातपूर, पिंपळगाव बसवंत, अमृतधाम 1, अमृतधाम 2, पेठ रोड & मेरी- मसारो, गाणगापूर रोड & शरणपूर रोड या भागांमध्ये डॉक्टरांची आवश्यकता आहे.
  • HAL नाशिक येथील भरती करिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • HAL नाशिक यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

HAL Nashik Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक.

  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचे आहेत.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने म्हणजेच ऑनलाइन पोर्टल द्वारे, ई-मेल द्वारे इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचे नाहीत.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जात सादर करायची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव या सर्व गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • 24 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले ऑफलाइन पद्धतीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायला घ्यावा.

HAL Nashik Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथील HAL Nashik Bharti 2024  भरतीसाठी ज्या डॉक्टरांनी अर्ज केलेले आहेत आशा डॉक्टरांन मधून योग्य उमेदवार निवडले जातील.
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही डॉक्टरांना TA / DA देण्यात येणार नाही.
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथील भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवारांनी जर अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराचे काम समाधान कारक नसल्यावर त्या उमेदवाराला पदावरून कधीही कमी करता येईल.
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथील HAL Nashik Bharti 2024  भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी  जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

HAL Nashik Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सदरील HAL Nashik Bharti 2024  भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या वेबसाईट वरून अर्ज मिळवायचा आहे. मिळालेला अर्ज संपूर्ण भरायचा आहे. अर्जामध्ये योग्य ती माहिती भरायची आहे. अर्जाबरोबर स्वयं स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडायचे आहेत. आणि हा अर्ज 24/10 2024 च्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर बाय हॅन्ड जमा करायचा आहे.
  • उमेदवारांचे अर्ज मिळाल्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या कमिटी द्वारे सदरील उमेदवाराच्या हॉस्पिटलची तपासणी करण्यात येईल. ज्यामध्ये सर्व सुविधा आहेत की नाहीत याबाबत माहिती चेक केली जाईल.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. पदरी भरतीची मुलाखत HAL हॉस्पिटल, ओझर टाऊनशिप या ठिकाणी घेण्यात येईल. उमेदवारांची निवड मुलाखतीत मिळालेल्या गुणांनुसार करण्यात येईल.
  • सदरील HAL Nashik Bharti 2024  भरती मधून नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता कामाचा कालावधी दोन वर्षाचा असेल. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला पुन्हा दोन वर्षात कालावधी वाढवून देण्यात येईल. जर उमेदवारांनी समाधानकारक काम केले असेल तर.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा चालू ईमेल आयडी भरणे गरजेचे आहे. कारण उमेदवाराला मुलाखती संदर्भात माहिती ई-मेल द्वारे देण्यात येईल. ईमेल द्वारे उमेदवारांना मुलाखतीचे योग्य वेळ सांगण्यात येईल.
  • जर उमेदवाराने एमबीबीएस पदवी नंतर दोन वर्षाचा अनुभव मिळवलेला असेल तर अशा उमेदवाराला दरमहा 5400 रुपये मानधन देण्यात येईल.
  • जर उमेदवाराने एमबीबीएस पदवी नंतर पदव्युत्तर पदवी मिळवलेली असेल तर अशा उमेदवाराला दरमहा 9300 रुपये मानधन देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • सदरील भरती करिता फक्त अर्ज केला म्हणून उमेदवाराला नोकरी मिळाली असे नाही. नोकरी मिळण्याकरिता उमेदवाराला निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
  • सदरील HAL Nashik Bharti 2024  भरती मधील उमेदवारांची निवड हे पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर होणार आहे. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला पदरी नोकरीवर कायमस्वरूपी चा हक्क सांगता येणार नाही.
  • पदावर नियुक्त झालेल्या डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या मानधना व्यतिरिक्त इतर कोणताही अलाउन्स देण्यात येणार नाही.
  • उमेदवाराचे वय आणि अनुभव जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून मोजण्यात येईल.
  • पदावर नियुक्त झालेल्या डॉक्टरांना औषधांची नावे देत असताना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या लेटर वर देणे गरजेचे राहील.
  • पदावर नियुक्त झालेल्या डॉक्टरांना त्यांच्या नावाचा शिक्का हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात येईल.
  • जर इमर्जन्सी केस मध्ये डॉक्टरांनी बाहेरील मेडिसिन पेशंटला देण्यात आली तर अशा औषधांचा खर्च हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून पाच दिवसाच्या आत मध्ये मिळेल.
  • जर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करण्याकरिता उशीर झाला तर त्याची कसलीही जबाबदारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडून घेण्यात येणार नाही.
  • सदरील HAL Nashik Bharti 2024  भरती करिता वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment