MAHA REAT Bharti 2024 महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण येथे योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. या भरती मधून 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण येथील भरती मधून 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण या भरती मधून शिपाई, वाहन चालक, कनिष्ठ लिपिक, अभिलेख पाल, लघु टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, सहाय्यक अधिक्षक, अधिक्षक, वित्त व लेखाधिकारी, निम्नश्रेणी लघुलेखक, स्वीयं सहाय्यक, खाजगी सचिव या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
रयत शिक्षण संस्थेमार्फत भरती निघालेली आहे.
MAHA REAT Bharti 2024 | महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठी MAHA REAT Bharti 2024 10वी / 12वी / पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार सदरील भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
- सदरील भरतीसाठी MAHA REAT Bharti 2024 अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वयाची अट जाहिरातीमध्ये देण्यात आलेली नाही.
- खाजगी सचिव या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. ज्या उमेदवाराकडे विधी शाखेची पदवी आहे आशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रतिमिनिट असावे तर मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असावे. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट असावे. टंकलेखन आणि लघुलेखन संदर्भात उमेदवाराकडे संबंधित प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराकडे उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय यापैकी कोणत्याही एका न्यायालयात खाजगी सचिव म्हणून काम केलेला 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. अपिलिय न्यायाधिकरणाच्या न्यायिक कामामध्ये पदावर नियुक्त झाल्यानंतर डिक्टेशन करून घेणे क्रमप्राप्त राहील.
- स्वीयं सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी असावी. उमेदवाराला लघुलेखन आणि टंकलेखन यामध्ये पारंगत प्राप्त असावे. उमेदवाराचे इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट व मराठी लघुलेखन 120 शब्द प्रतिमिनिट वेगाचे असावे. उमेदवाराचे इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट असावे. टंकलेखन व लघुलेखन यासंदर्भात उमेदवाराकडे परीक्षा उत्तीर्ण केलेल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT कोर्स पूर्ण केला पाहिजे. उमेदवाराकडे पाच ते सात वर्षाचा न्यायालय किंवा न्यायाधिकरण मधील कामाचा अनुभव पाहिजे. न्यायाधिकरणाच्या न्यायिक कामामध्ये पदावर नियुक्त झाल्यानंतर श्रुतलेखन करून घेणे क्रमप्राप्त राहील.
- निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची लघुलेखन इंग्रजी 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 100 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. टंकलेखन आणि लघुलेखन यासंदर्भात परीक्षा पास केलेल्याचे शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थे मधून MS-CIT उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे किमान दोन वर्षाचा न्यायालय आणि न्यायाधिकरणाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- वित्त व लेखा अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी, प्राधान्याने लेखा, वाणिज्य किंवा सांख्यिकी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत न्यायालय किंवा न्यायाधिकरण येथे नियमित स्वरूपी किंवा कंत्राटी तत्त्वावर लेखापाल म्हणून काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे ऑपरेटिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर चे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मौखिक आणि लेखी संप्रेषण कौशल्यांमध्ये प्रवीणता मिळवणे आवश्यक आहे. जो उमेदवार संगणक साक्षर असेल अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- अधीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवाराकडे विधी शाखेची पदवी आहे आशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराकडे अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक म्हणून न्यायालय किंवा न्यायाधिकरण येथे तीन ते पाच वर्षे काम केलेला अनुभव पाहिजे.
- सहाय्यक अधिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. सहाय्यक अधिक्षक किंवा वरिष्ठ लिपिक या पदावर न्यायालय किंवा न्यायाधिकरण येथे कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित स्वरूपाने तीन ते पाच वर्ष काम केलेला अनुभव पाहिजे. उमेदवाराची सदरील पदावर निवड झाल्यानंतर प्रबंधनाणे नेमून दिलेली सर्व कार्यालयीन कामे पार पाडावी लागतील.
- माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान ( संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान ) या शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे तीन वर्ष न्यायालय किंवा न्यायाधिकरण येथे तीन वर्षे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
- तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान ( संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान ) या शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कंत्राटी तत्त्वावर न्यायालय किंवा न्यायाधिकरण येथे काम केलेला एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- लघु टंकलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे लघुलेखन इंग्रजी 80 शब्द प्रति मिनिट व मराठी 80 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे. टंकलेखन आणि लघुलेखन संदर्भातील परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली आणि त्याबाबत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अभिलेखापाल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. न्यायालय किंवा न्यायाधिकरण या ठिकाणी दोन वर्षे काम केलेला अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित स्वरूपी कोणत्याही प्रकारचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराचे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे लिपिक पदावर दोन वर्ष कंत्राटी तत्त्वाने किंवा नियमित स्वरूपाने न्यायालय किंवा न्यायाधिकरण येथे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
- वाहनचालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 ( क्र. 51 / 1988 ) याप्रमाणे हलके वाहन ( LMV ) चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या तारखेपासून उमेदवाराकडे हलके आणि जड वाहन चालवण्याचा किमान सात वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वाहनचालक म्हणून उमेदवाराचा कार्यकाळ स्वच्छ असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे वाहन दुरुस्तीचे आणि देखभालीचे सर्वसाधारण ज्ञान असणे गरजेचे आहे. वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या उमेदवाराला मुंबई शहराची प्रादेशिक माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवार निर्व्यसनी, सुदृढ आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा. वाहनचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. वैद्यकीय दृष्ट्या उमेदवार सक्षम असलेले प्रमाणित केल्यानंतरच उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल. वाहन चालकाला वाहन चालवणे व्यतिरिक्त रुपयाची कामे आणि इतर कामे करावी लागतील.
- शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे न्यायालय किंवा न्यायाधिकरण या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित काम केलेल्या दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
MAHA REAT Bharti 2024 | महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण येथील भरतीसाठी नियम व अटी खालील प्रमाणे
- सदरील भरतीसाठी MAHA REAT Bharti 2024 अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे यांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत सत्यप्रती जोडलेल्या नसतील तर अर्ज बाद करण्यात येईल. 23 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पत्राद्वारे, कुरियर द्वारे किंवा प्रत्यक्ष जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहून जमा करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज लिफाफा मध्ये बंद करून पाठवावा. त्या लिफाफ्यावरती कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते ठळक अक्षरात नमूद करावे.
- सुरुवातीला पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 11 महिन्यांसाठी करण्यात येईल. उमेदवाराचे काम समाधानकारक वाटल्यानंतर 11 महिन्यानंतर पुन्हा 11 महिन्यासाठी त्याला पदावर नियुक्त करण्यात येईल. सदरील नियुक्ती ही पूर्णपणे कंत्राटी तत्वावर असणार आहे.
- सदरील भरतीसाठी MAHA REAT Bharti 2024 उमेदवार ज्या पदाकरिता पात्र आहेत त्या पदासाठी उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. पात्रतेची पूर्तता होत नसल्यास उमेदवारांनी त्या पदासाठी अर्ज करू नये.
MAHA REAT Bharti 2024 | अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सदरील भरती MAHA REAT Bharti 2024 मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ‘ प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्स इमारत, डॉ. वी. बी. गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई 400001 ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील भरतीसाठी MAHA REAT Bharti 2024 उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुना नुसार याचा अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.