Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग येथे 102 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण महिला व बालविकास विभाग येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. महिला व बालविकास विभाग यांच्याद्वारे निघालेल्या भरती मधून 102 रिक्त जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 23 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ‘ मुख्यसेविका गट- क’ या पदाकरिता योग्य उमेदवारांची नेमणूक सदरील भरती मधून केली जाणार आहे. महिला व बालविकास विभाग येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील लेख काळजीपूर्व वाचावा.

  • 102 रिक्त पदांकरिता महिला व बालविकास विभाग यांच्याकडून भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
  • ‘ मुख्यसेविका गट- क’ या पदाकरिता सदरील भरती मधून योग्य उमेदवार निवडणार आहेत.

शिवनेरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे भरती.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • ‘ मुख्य सेविका गट क’ या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा. याबाबत त्या उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून गणना येईल.
  • सदरील भरती करिता खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षापेक्षा कमी नसावे. त्याचप्रमाणे 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी नसावे. आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • पदवीधर किंवा अंशकालीन पदवीधर या उमेदवारांकरिता वय वर्षापेक्षा कमी नसावे. आणि 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करणारे उमेदवार जर स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असतील तर अशा उमेदवारांकरिता कमीत कमी वय 21 वर्षे पाहिजे. तर जास्तीत जास्त वय 45 वर्ष असावे.
  • अर्ज करणाऱ्या खेळाडू उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारा करिता वय मर्यादा 43 वर्षे इतकी राहील.
  • अर्ज करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांकरिता वय मर्यादा 45 वर्षे इतकी राहिले.
  • प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त या उमेदवारांना वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील. माजी सैनिक उमेदवारांकरिता वय मर्यादा 45 वर्षांपर्यंत राहील.
  • मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून किंवा संविधानिक विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • सदरील Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता दरमहा 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन मिळणार आहे.
  • मिळालेल्या अर्ज मधून योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता उमेदवाराची ऑनलाइन बहुपर्यायी चाचणी घेण्यात येईल. या चाचणीमध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन गुण देण्यात येतील. शासकीय नियमानुसार सदर की भरती करिता उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही. उमेदवारांची घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षेमध्ये जर उमेदवाराला गुणवत्ता यादी मध्ये यायचे असेल तर अशा उमेदवारांना एकूण गुणांच्या 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करत असताना ज्या दोन उमेदवारांना समान गुण मिळालेले आहेत आशा उमेदवारांपैकी एका उमेदवाराची निवड महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल.
  • सदरील भरती मधील अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड कॉम्प्युटर बेस ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. सदरील परीक्षा ही वेगवेगळ्या सत्र मध्ये होणार आहे. वेगवेगळ्या सत्रामध्ये उमेदवारांना वेगवेगळी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या भरतीचे कठीणता तपासण्याचे काम TCS कंपनीद्वारे करण्यात येणार आहे.
  • महिला व बालविकास विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी वाचायची आहे. जाहिरात पहा.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज जमा करण्याकरिता महिला व बालविकास विभाग यांच्याकडून पत्ता देण्यात आलेला आहे.
  • ‘ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगांव ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • सदरील Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 भरती मध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी. या पैकी खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर या प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  • सदरील Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची कॉम्प्युटर बेस ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा करिता किंवा या परीक्षेपूर्वी उमेदवाराची कोणती प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे पडताळून जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेत मिळालेल्या मार्क्सच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
  • घेण्यात येणारा परीक्षेमध्ये उमेदवार जर पात्र ठरत असेल तर पात्र उमेदवारांनी खालील देण्यात आलेली कागदपत्रे जमा करायचे आहेत. ही कागदपत्रे उमेदवाराची पडताळली जातील.
  1. अर्जामधील नावाच्या पुराव्या करिता 10वी बोर्ड सर्टिफिकेट
  2. वयाचा पुरावा
  3. शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्याचा पुरावा.
  4. सामाजिक रित्या मागास असल्याचा पुरावा
  5. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा
  6. प्रकल्पग्रस्त असल्याचा पुरावा
  7. अंशकालीन पदवीधर असल्याचा पुरावा
  8. मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, आराखीव महिला, दिव्यांग, माझी कर्मचारी, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ यांच्याबाबत प्रमाणपत्र
  9. लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
  10. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्ज सादर करायचा अंतिम दिनाच्या आधीचे
  11. दिव्यांग व्यक्ती म्हणून पात्र असलेला पुरावा
  12. खेळाडू आरक्षणा करिता आवश्यक प्रमाणपत्र
  13. अनाथ आरक्षणासाठी प्रमाणपत्र
  14. भूकंपग्रस्त आरक्षण पात्र प्रमाणपत्र
  15. नावात बदल केला असेल तर पुरावा
  16. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  17. संगणकाचे ज्ञान असल्याचा पुरावा.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बालविकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • इच्छुक उमेदवारांचे अर्ज देण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणाली द्वारे फक्त स्वीकारण्यात येतील.
  • मुख्य सेविका या पदाकरिता इच्छुक उमेदवारांना फक्त एकच अर्ज करता येईल.
  • अर्ज करण्याकरिता आवश्यक संकेतस्थळ जाहिरातीत देण्यात आलेला आहे.
  • सदरील Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे.
  • Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 भरती साठी केलेला अर्ज जर उमेदवाराने परीक्षा शुल्क भरलेली नसेल तर आशा उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सदरील Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क स्वीकारण्याची अंतिम दिनांक संगणकामार्फत निश्चित केलेली आहे. अंतिम दिनांक दिवशी अर्ज करण्याची लिंक आणि शुल्क स्वीकारण्याचे पेमेंट गेटवे दोन्हीही बंद करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम दिनांकाच्या आधी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ज्यावेळेस उमेदवार अर्ज सादर करत असतात अशा वेळेस उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडावे लागणार आहे.
  • निवडलेल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही उमेदवाराची मान्य करता येणार नाही.
  • अर्जामध्ये परीक्षा केंद्र निवडण्याच्या ठिकाणी जर उमेदवारांनी परीक्षा केंद्र निवडले नाही. तर अशा उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र उमेदवाराच्या राहत्या पत्त्याच्या जवळचे परीक्षा केंद्र उमेदवाराला देण्यात येईल.
  • महिला व बालविकास विभाग येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते उमेदवारांनी संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment