Nagpur Metro Bharti 2024 | नागपूर मेट्रो येथील भरती मध्ये ‘ ऑफिस असिस्टंट ‘ या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Nagpur Metro Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील भारतीय संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून एकूण तीन जागा भरण्यात येणार आहेत. ‘ ऑफिस असिस्टंट’ या पदाकरिता सदरील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 30 ऑक्टोबर 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी जाहिरातीत देण्यात आलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील लेखामध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 03 रिक्त जागा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर यांच्याकडून भरण्यात येणार आहेत.
  • ‘ ऑफिस असिस्टंट ‘ या पदाकरिता भरती मधून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर भरती

Nagpur Metro Bharti 2024 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • ऑफिस असिस्टंट ( प्रोजेक्ट ) – NS4 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे तीन वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव उमेदवाराने शासकीय संस्था मध्ये काम करून मिळवलेला असावा. त्यामध्ये त्याने डॉक्युमेंट कलेक्टर, रेकॉर्ड कीपर यांसारखी कामे केलेली असावीत.

     

  • ऑफिस असिस्टंट ( O&M )- NS4 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शासकीय संस्थेमधून किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी तीन वर्षाचा ऑफिस कामाचा अनुभव असावा. या अनुभवामध्ये त्याने दररोजचे ऑफिसचे काम, इन वर आउट वर्ड करेस्पोंडेन्स, रेकॉर्ड कीपिंग, कॉन्ट्रॅक्ट एग्रीमेंट, टेंडर, कोटेशन, वर्क ऑर्डर डॉक्युमेंट, प्रिपेयर रिपोर्ट्स, सॉफ्टवेअर चालवणे, मेंटेनन्स ठेवणे यांसारखी कामे उमेदवाराला आली पाहिजेत.

     

  • ऑफिस असिस्टंट ( ऍडमिनिस्ट्रेशन ) – NS4 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा. ऍडमिनिस्ट्रेशन काम, रिसेप्शन हँडल करणे, पर्सनल सेक्रेटरी यांसारख्या कामाचा उमेदवाराकडे अनुभव असणे गरजेचे आहे.
  • ऑफिस असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत असावेत.

     

  • ऑफिस असिस्टंट ( प्रोजेक्ट ) NS-4 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 ते 60 हजार रुपये वेतन मिळणार आहे.

     

  • ऑफिस असिस्टंट ( O & M ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 ते 60 हजार रुपये वेतन मिळणार आहे.

     

Nagpur Metro Bharti 2024 
Nagpur Metro Bharti 2024
  • सदरील Nagpur Metro Bharti 2024  भरती मधील पदांकरिता योग्य उमेदवार मुलाखत, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी या प्रक्रियेद्वारे निवडले जाणार आहेत. उमेदवाराचे नॉलेज, कौशल्य, अनुभव, प्रावीण्य, शारीरिक सुदृढता निवड करताना तपासण्यात येणार आहे. सदरील भरती मधील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्र जाहिरातीत देण्यात आलेली आहे. एससी / एसटी/ ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.

     

  • Nagpur Metro Bharti 2024  भरतीसाठी केलेले अर्ज 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर आलेले पाहिजेत.
  • सदरील Nagpur Metro Bharti 2024  भरती मधून योग्य उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
  • Nagpur Metro Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • ‘ मेट्रोभवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमीजवळ, रामदासपेठ, नागपूर – 440 010.’ या पत्त्यावर भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी याच्यावर क्लिक करा.

Nagpur Metro Bharti 2024 | महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील Nagpur Metro Bharti 2024  भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर या Nagpur Metro Bharti 2024  भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही वेबसाईट संस्थे कडून देण्यात आलेली नाही.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, अनुभव, शैक्षणिक पात्रता, वय यासंदर्भात सर्व तपशील योग्य आणि बरोबर लिहायचा आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन, लिमिटेड नागपूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • 30 ऑक्टोबर 2024 ही सदरील Nagpur Metro Bharti 2024  भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे.

Nagpur Metro Bharti 2024 | महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार सदरील भरतीसाठी पात्र असतील.
  • महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
  • 30 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी ‘मेट्रोभवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमीजवळ, रामदासपेठ, नागपूर – 440 010.’ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • उमेदवाराला मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. दिलेल्या वेळेत उमेदवारांनी मुलाखतीसाठी येत असताना फॉर्मल कपड्यावर यायचे आहे.
  • सदरील भरती करिता कोणत्या पदाकरिता किती शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे. याबद्दलची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Nagpur Metro Bharti 2024 | महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील भरती बाबत अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी दिलेल्या ईमेल आयडी द्वारे उमेदवारांची निवड झाली आहे का नाही हे उमेदवाराला कळवण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराला दिलेल्या तारखेवर मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र सोबत घेऊन यायचे आहे. उमेदवाराची मुलाखत ” मेट्रो भवन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, नियर दीक्षाभूमी, रामदास पेठ, नागपूर- 440010″ या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक उमेदवार सोबत वैयक्तिक निवडी संदर्भात पत्रव्यवहार केला जाणार नाही. उमेदवाराला कागदपत्रांच्या ओरिजनल कॉपी सोबत घेऊन बसायचे आहेत.
  • दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये उमेदवारांना त्याची माहिती लिहायची आहे आणि सोबत दोन पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचे आहेत. ज्या उमेदवारांनी अपूर्ण माहिती लिहून अर्ज पाठवलेला आहे आशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार जर मेट्रो रेल / रेल्वे / गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन / पब्लिक सेक्टर कंपनी यांच्याद्वारे अर्ज करत असतील तर आशा उमेदवाराकडे काम करत असलेल्या संस्थेचा ना हरकत दाखला असणे गरजेचे आहे.

     

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 400 रुपये असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्ट च्या स्वरूपात भरायचे आहे. किंवा जाहिरातीत दिलेल्या SBI अकाउंट नंबर वर यूपीआय द्वारे पाठवायचे आहे. एस सी / एसटी / महिला प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क नसणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी डिमांड ड्राफ्ट च्या एका बाजूला उमेश स्वतःचे नाव, जन्मतारीख, पोस्ट नेम, पिनकोड लिहायचे आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ओबीसी सर्टिफिकेट नवीन नियमानुसार बनवलेले जमा करावी लागणार आहे. एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांना जातीचा दाखला मुलाखतीच्या वेळेस दाखवावा लागणार आहे.
  • महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथील Nagpur Metro Bharti 2024  भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a Comment