North East Frontier Railway Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या होणाऱ्या भरती मधून 5647 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. सदरच्या होणाऱ्या भरती मधून ‘ अप्रेंटिस ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडला जाणार आहे. 3 डिसेंबर 2024 ही सदरील भरती करिता देण्यात आलेली अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. त्याचप्रमाणे अधिक माहिती करिता सर्व उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख वाचावा.
- 5647 रिक्त पदांकरिता उत्तर पूर्व रेल्वे सीमा यांच्याकडून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
- उत्तर पूर्व रेल्वे सीमा येथील होणाऱ्या भरती मधून ‘ अप्रेंटिस ‘ पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची सुवर्णसंधी.
North East Frontier Railway Bharti 2024 | उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसावे. आणि अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट असेल. OBC प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षे सूट असेल. PWBD या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 10 वर्षे सूट असेल.
- SC / ST किंवा OBC या प्रवर्गातील उमेदवारांना जर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर आशा उमेदवारांनी कास्ट सर्टिफिकेट ऑनलाइन अपलोड करणे गरजेचे आहे. उमेदवाराला मिळालेले कास्ट सर्टिफिकेट तहसीलदार पदापेक्षा कमी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले नसावे.
- इकॉनोमिकली विकर सेक्शन (EWS ) या प्रवर्गातील उमेदवारांकरिता संपूर्ण भरती मध्ये 10% जागा रिक्त असणार आहेत. 10% जागा राखीव आहेत.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क ₹ 100 असणार आहे. ज्यावेळेस उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर त्या उमेदवाराला परीक्षा शुल्क भरण्याकरिता वेबसाईट देण्यात येईल. त्या पेजवर उमेदवाराला पाठवण्यात येईल.
- एकदा परीक्षा शुल्क उमेदवाराने भरल्यानंतर उमेदवाराला उर्वरित राहिलेला अर्ज भरण्याची संधी देण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवाराला संबंधित अर्ज डाऊनलोड करावा लागणार आहे.
- SC / ST / PWBD / EBC / WOMEN या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांना EBC या प्रवर्गातून आरक्षण पाहिजे असेल त्या उमेदवारांच्या घरचे वार्षिक उत्पन्न 50,000 रुपये प्रति वर्ष असल्याचा दाखला असणे गरजेचे आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावीचे बोर्डाचे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे प्रोव्हिजनल आयटीआय पासिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आयटीआय पास झाल्याचे फायनल मार्कशीट असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 12 वी परीक्षा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी द्वारे उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी मिळालेल्या अर्जा मधून उमेदवारांची निवड युनिट प्रमाणे, ट्रेड प्रमाणे आणि कम्युनिटी प्रमाणे होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता मेरिट लिस्ट प्रत्येक युनिट ची वेगवेगळी तयार करण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10 वी मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
North East Frontier Railway Bharti 2024 | उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता उमेदवारांकरिता जाहिरातीमध्ये संकेतस्थळ देण्यात आलेली आहे. त्या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा समक्ष पत्त्यावर उपस्थित राहून अर्ध जमा करायचे नाहीत.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी योग्य त्या वेबसाईट द्वारे अर्ज करायचे आहेत. इतर कोणत्याही वेबसाईट द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे नाहीत. चुकीची माहिती अर्जामध्ये उमेदवारांनी भरायची नाही. अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- 3 डिसेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही. कारण अर्ज करण्याची वेबसाईट बंद होणार आहे.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात काळजीपूर्वक वाचल्यानंतर उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
North East Frontier Railway Bharti 2024 | उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवारास सदरील भरती करिता पात्र असणारा आहेत. इतर कोणत्याही उमेदवाराला डायरेक्ट अर्ज न करता भरती मध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीच्या प्रक्रिये करिता स्वखर्चाने यायचे आहे. भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्याकडून TA / DA देण्यात येणार नाही.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार करू नये. अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्या संदर्भात अधिक माहिती समजून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
- उत्तर पूर्व सीमा रेल्वे येथील भरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख 4 नोव्हेंबर 2024 ही आहे. ऑनलाइन अर्ज करायला 4 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून सुरुवात होणार आहे. 3 डिसेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- सदरील भरती मधून उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे. अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्वारे उमेदवारां सोबत पुढील संवाद साधला जाणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या अप्रेंटिस उमेदवारांकरिता कार्यकाळ एक वर्षाचा असणार आहे. त्याचप्रमाणे सदरील भरती मधून जातीय प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देण्यात आलेले आहे. अपंग उमेदवारांकरिता आरक्षण आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान ठराविक मानधन देण्यात येणार आहे. त्या मानधना नुसार उमेदवाराने काम करायचे आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैद्यकीय मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.