PM Internship Scheme 2024 | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत 8000+ उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

PM Internship Scheme 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरतीचे आयोजन भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने केलेले आहे. या होणाऱ्या भरती मधून 8000+ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘PM इंटर्नशिप योजना ‘ या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाकरिता योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत. सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 8000+ रिक्त जागा प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने कडून भरण्यात येणार आहेत.
  • ‘ प्रशिक्षणार्थी’ या पदाकरिता सदरील योजनेमधून योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल येथे भरती.

PM Internship Scheme 2024 | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी / 12वी / ITI / डिप्लोमा / BA / B.Sc / B.Com / BCA / BBA / B.Pharma यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

     

  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 24 वर्षापर्यंत असावे.

     

  • PM Internship Scheme 2024 या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.

     

  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल. त्याचप्रमाणे उमेदवारांना भारतातील प्रमुख कंपन्यांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळेल. हा प्रशिक्षण कालावधी 12 महिन्याचा असणार आहे. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 5000 रुपये सहाय्य मिळणार आहे. त्याचप्रमाणे एक वेळ अनुदान 6000 रुपये मिळणार आहे.

     

  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामध्ये उमेदवारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत संरक्षण मिळणार आहे.
  • सदरील PM Internship Scheme 2024 भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य ज्या उमेदवारांकडे आहे आशा उमेदवारांना पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. 2024-25 यावर्षी एकूण 1.25 लाख प्रशिक्षणार्थी उमेदवारांना पदावर नियुक्त करण्याची योजना सरकारद्वारे राबविण्यात येणार आहे. भारत देशातील ज्या प्रमुख कंपन्यांमध्ये उमेदवारांना इंटर्नशिप मिळणार आहे आशा कंपन्यांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

     

  • या इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी 12 महिन्यांची असणार आहे.

     

PM Internship Scheme 2024 
PM Internship Scheme 2024
  • आयआयटी, आआयएम, राष्ट्रीय विधी महाविद्यालय, IISER, NID, IIIT या संस्थांना मधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता सदरील कार्यक्रम नाही आहे. ज्या उमेदवारांकडे CA, CMA, CS, BAMS, BDS, MBA केव्हा कोणतीही पदवीधर पदवी आहे आशा उमेदवारांसाठी सदरील इंटर्नशिप कार्यक्रम नाही. अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी यापूर्वी NATS किंवा NAPS यापैकी कोणत्याही योजनांच्या द्वारे प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल तर अशा उमेदवारांकरिता सदरील योजना नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक उत्पन्न 2023-2024 सालचे 8 लाख रुपये पेक्षा अधिक असेल आशा उमेदवारांना सदरील भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या घरातील सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर अशा उमेदवारांना सदरील भरती करिता अर्ज करता येणार नाही.
  • सदरील PM Internship Scheme 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना सरकारकडून दरमहा 5000 रुपये वेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर उमेदवाराचे कंपनीमध्ये काम आणि आचरण समाधानकारक असेल तर कंपनीच्या सीएसआर फंड मधून उमेदवाराला दरमहा ₹ 500 देण्यात येतील. ज्यावेळेस कंपनीच्या सीएसआर फंडामधून उमेदवाराला ₹500 मिळतील त्यानंतर उमेदवाराला दरमहा सरकार कडून 4500 रुपये त्याच्या खात्यावर जमा करेल. या प्रशिक्षणाचे शुल्क उमेदवाराला मिळणाऱ्या रकमेतून कमी करण्यात येणार आहे.
  • केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयाद्वारे एक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्याच्या माध्यमातून उमेदवाराला काम कसे करायचे हे सांगण्यात येणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी www.pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. त्यानंतर उमेदवारांना ज्या कंपनीमध्ये इंटर्नशिप साठी अप्लाय करायचे आहे आशा कंपनीचा डॅशबोर्ड त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये कामाचे ठिकाण, कामाचे स्वरूप, आवश्यक शैक्षणिक पात्रता कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

PM Internship Scheme 2024 | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे आहेत.

  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना येथील भरतीसाठी सर्व उमेदवारांनी जाहिराती देण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

     

  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा कोणताही पत्ता देण्यात आलेला नाही. किंवा ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवण्याची पद्धत सदरील संस्थेकडून देण्यात आलेली नाही.

     

  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना ज्या उमेदवारांनी पात्रतेची पूर्तता केलेली आहे अशा उमेदवारांनी अर्ज करावा. ऑनलाइन अर्जामध्ये खोटी माहिती लिहून कोणत्याही उमेदवारांनी अर्ज जमा करायचा नाही. आशा उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल.

     

  • PM Internship Scheme 2024 या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक अजून देण्यात आलेली नाही. ती दिनांक वेळापत्रकानुसार देण्यात येणार आहे.

     

  • पीएम इंटर्नशिप योजना ही योजना मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या योजनेची जाहिरात काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी समजून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

PM Internship Scheme 2024 | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना या योजना करिता अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे.

  • सदरील PM Internship Scheme 2024 भरती मध्ये समाविष्ट होण्याकरिता उमेदवारांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना यांच्याद्वारे देण्यात आलेल्या वेबसाईट द्वारे अर्ज केलेला असणे आवश्यक आहे. अर्ज न केलेल्या उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार नाही.

     

  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवारांना संस्थे कडून TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.

     

  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना या योजनेमध्ये पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

     

  • मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.

PM Internship Scheme 2024 | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना याकरिता आवश्यक माहिती खालील प्रमाणे.

  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही भारतातील युवकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतातील युवकांचे कौशल्य सुधारण्याकरिता आणि त्यांना करिअरमध्ये योग्य दिशा दाखवण्याकरिता सदरील योजना महत्वपूर्ण आहे. ‘ प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. यावरती द्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांसोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

     

  • युवकांना कॉर्पोरेट सेक्टरमधील कंपन्यां बद्दल माहिती मिळवून देणे आणि युवकांचे कौशल्य वाढवून भविष्यातील कामाकरिता सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे, विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळवून देणे, कौशल्य विकासासाठी काम करणे, प्रशिक्षणाला येणाऱ्या उमेदवारांना योग्य मानधन देणे हे या संस्थेचे काम आहे. या भरती करिता अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  • प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना या योजनेसंदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment