SAI Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून ‘ कनिष्ठ सल्लागार’ या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 3 नोव्हेंबर 2024 ही सगळी भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे आहेत. अधिक माहिती जाणून घेण्याकरिता भारतीय क्रीडा प्राधिकरण त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. विस्तृत माहिती समजून घेण्यासाठी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.
- 02 रिक्त जागांकरिता भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनी भरतीचे आयोजन केलेले आहे.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याद्वारे होणाऱ्या भरती मधून ‘ कनिष्ठ सल्लागार ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
प्रधानमंत्री प्रशिक्षण योजना भरती 2024
SAI Bharti 2024 | भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची मर्यादा खालील प्रमाणे आहे.
- कनिष्ठ सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून फायनान्स / अकाउंट / कॉमर्स या शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. किंवा कर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून फायनान्शियल मॅनेजमेंट / अकाउंटिंग / CA / ICMA या शाखेचा दोन वर्षाचा PG डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा कमीत कमी पाच वर्ष अनुभव संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे सरकारी / निमसरकारी / ऑटोनॉमस / पब्लिक सेक्टर या क्षेत्रातील कामाचा अनुभव असेल आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापर्यंत असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा वेतन 80,250 रुपये मिळणार आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या एससी / एसटी / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये सूट देण्यात येणार आहे.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरील भरतीमध्ये वयामध्ये सूट देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांकडे दोन ते तीन वर्षाचा अनुभव आहे अशा उमेदवारांना वयामध्ये एक वर्ष सुट देण्यात येणार आहे. तीन ते पाच वर्ष ज्या उमेदवारांचा अनुभव आहे आशा उमेदवारांना वयामध्ये दोन वर्ष सुट देण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवाराकडे पाच ते सात वर्षाचा अनुभव आहे आशा उमेदवारांना तीन वर्ष सूट देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांकडे 7 ते 9 वर्षाचा अनुभव आहे आशा उमेदवारांना चार वर्षे सूट देण्यात येणार आहे. 9 ते 11 वर्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे. 11 ते 13 वर्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांना सहा वर्ष सूट देण्यात येणार आहे. 13 ते 15 वर्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांना सात वर्षे सूट देण्यात येणार आहे. 15 ते 17 वर्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांना आठ वर्षे सूट देण्यात येणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची 10वी किंवा 12 वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर असणारी जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसारच उमेदवाराचे वय मोजण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- उमेदवाराला मिळणाऱ्या पगार मधून सरकारी नियमानुसार टॅक्स कट करण्यात येणार आहे.
- कामावर नियुक्त केलेल्या उमेदवाराचे काम जर समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना काही कालावधीनंतर वेतन वाढ देण्यात येणार आहे. दरवर्षी पगारामध्ये 7% वाढ देण्यात येणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार सुट्टी राहील. पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना इकॉनोमिक क्लास किंवा रेल्वे द्वारे प्रवासी सहाय्यता मिळणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेलचा खर्च 2250 रुपये दिन अशा स्वरूपात मिळणार आहे. एका दिवसाचा ट्रॅव्हलिंग चा खर्च 338 रुपये प्रतिदिन असा मिळणार आहे.
- सदरील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
SAI Bharti 2024 | भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी सदरील भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची लिंक जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी पदरी भरती करिता पत्त्यावर आपले अर्ज पाठवू नयेत. आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवारांनी अर्जामध्ये चुकीची माहिती लिहू नये. किंवा अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे खोटे किंवा बनावट जोडू नयेत. असे करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- 3 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाहीत. कारण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची वेबसाईट किंवा पोर्टल या तारखेनंतर बंद होणार आहे.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
SAI Bharti 2024 | भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज केलेले आहेत. असे उमेदवारच सदरील भरतीसाठी पात्र असणार आहेत. इतर उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये संधी मिळणार नाही.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरती मध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही. याचे सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदरच्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार घडला तर अशा उमेदवारावर भारतीय क्रीडा प्राधिकरण द्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण संदर्भात उमेदवारांना जर अधिक माहिती हवी असेल तर अशा उमेदवारांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
SAI Bharti 2024 | भारतीय क्रीडा प्राधिकरण या संस्थेबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.
- भारताच्या क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय क्रीडा प्राधिकरण ही संस्था आहे. या संस्थेलाच स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असे म्हणतात. भारतीय क्रीडा प्राधिकरणाची 1984 रोजी स्थापना झाली होती. 1984 पासून भारताच्या क्रीडा क्षेत्रामध्ये विकास करण्याचे काम मूलभूत पणे भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनी बजावलेली आहे.
- भारतातील खेळाडूंना जगातील उत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम ही संस्था करत आहे. त्याचबरोबर खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बलवान बनवण्यासाठी ही संस्था काम करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान क्रीडा क्षेत्रामध्ये आणण्याचे काम सदरील संस्थेत मार्फत होत आहे. देशामध्ये नवनवीन खेळाडू तयार करणे हे काम सदरील संस्था करत आहे.
- स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे संपूर्ण देशभरात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्याकरिता विविध कार्यक्रम आणि योजना चालवल्या जातात. भविष्य काळामध्ये याच योजनांमुळे भारतीय क्रीडाक्षेत्र खूप प्रगती करेल आणि विविध स्पर्धांमध्ये यश मिळवेल.
- टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम, नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट, खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा शिबिरे यांसारखे उपक्रम स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याद्वारे चालवण्यात येत असतात.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.