TIFR Bharti 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे 15 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

TIFR Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या TIFR Bharti 2024 भरती मधून ” लिपिक प्रशिक्षणार्थी ” या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 18 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 15 रिक्त जागा भरण्याकरिता टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था निखिल भारतीय मधून ” लिपिक प्रशिक्षणार्थी ” या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे भरती

TIFR Bharti 2024
TIFR Bharti 2024

TIFR Bharti 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील होणाऱ्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

भरती संदर्भात माहिती खालील प्रमाणे

  • मुलाखतीची तारीख: 18 नोव्हेंबर 2024
  • मुलाखतीची वेळ: 9:00 वाजता (9:00 नंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश मिळणार नाही.)
  • लेखी परीक्षा सुरू होण्याची वेळ: 10:00 वाजता
  • लेखी परीक्षा संपण्याची वेळ : 1:30 वाजता
  • परीक्षेचे ठिकाण: TIFR, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400 005

पदाचे तपशील

Sr. No. Post Name Age Limit (Years) Tentative Vacancies Monthly Stipend Qualification
1 लिपिक प्रशिक्षणार्थी ( खाते ) 28 10 ₹22,000/- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण
  • टायपिंग आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक
  • मायक्रोसॉफ्ट एक्सेल येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे
  • वाणिज्य शाखेतून पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे
Sr. No. Post Name Age Limit (Years) Tentative Vacancies Monthly Stipend Qualification
2 लिपिक प्रशिक्षणार्थी ( प्रशासन) 28 10 ₹22,000/- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे Drafting आणि Excel संदर्भात अधिक ज्ञान असावे.
  • उमेदवाराकडे Govt./Semi-Govt./PSU अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

एकूण – 15 जागा ( तात्पुरत्या स्वरूपाच्या )

Note: सदरील रिक्त पदांची संख्या वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार कमी जास्त करण्यात येईल.

वरील पदांसाठी भरतीची प्रक्रिया खालील प्रमाणे

लिपिक प्रशिक्षणार्थी ( खाते )

  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
  • पदाकरिता परीक्षा 10:00 वाजता सुरू होणार आहे. सर्व उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

लिपिक प्रशिक्षणार्थी ( प्रशासन) 

  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी
  • निवड झालेल्या पहिल्या 20 पात्र उमेदवारांना कौशल्य चाचणी साठी बोलावण्यात येणार आहे. जर पात्र उमेदवार उपलब्ध नसले तर पुढील उमेदवारा गुणवत्ता यादी वरून उमेदवार निवडले जाणार आहेत.

सदरील भरतीसाठी अटी आणि शर्ती खालील प्रमाणे.

पदाचे स्वरूप:

  • सदरील TIFR Bharti 2024 भरती मधून उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरूपाची होणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचा कालावधी एक वर्षाचा कंत्राटी स्वरूपात असणार आहे.
  • सदरील भरती मधील उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची हमी देण्यात येणार नाही.

वयोमर्यादा:

  • TIFR Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 पर्यंत 28 वर्षे पर्यंत असावे.

प्रवासाचा खर्च:

  • मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही.

निवासाची व्यवस्था:

  • करणाऱ्या उमेदवारांनी राहण्याची सोय स्वतः करावी. संस्थे कडून कोणतीही मदत मिळणार नाही.

महत्वाचे कागदपत्र:

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्जाची ची प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड / मतदान कार्ड/ पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन ची मूळ आणि एक झेरॉक्स कॉपी

अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • टाटा मूलभूत संशोधन संस्था वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरा: http://www.tifr.res.in/positions
  • अर्ज भरताना उमेदवारांनी पात्रता काळजीपूर्वक तपासून खात्री करा.

मुलाखती संदर्भात माहिती खालील प्रमाणे

  • मुलाखतीच्या ठिकाणी येण्याचे मार्ग खालील प्रमाणे.
  • CST पासून: Route No. 3, 11, 125
  • चर्चगेट पासून: Route No. 137
  • हे सर्व routes नेव्ही नगरमध्ये संपतात, जे TIFR जवळ आहे.

परीक्षेसाठी खालील वस्तू सोबत आणणे

  • उमेदवारांनी क्लिप बोर्ड / रायटिंग पॅड आणि लिहिण्याचा पेन सोबत आणणे आवश्यक आहे.

महत्वाची सूचना:

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पात्रता आणि निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. TIFR Bharti 2024 भरतीसाठी पात्र नसलेल्या उमेदवारांचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.
  • कोणत्याही प्रकारे दबाव तंत्राचा उपयोग केल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाणार आहे.

पद भरण्याचा अधिकार:

  • सदरील भरतीसाठी संस्थेला कोणतेही/सर्व पद भरायचे किंवा न भरायचे पूर्णपणे अधिकार आहेत.

योग्य उमेदवारांसाठी टीप

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पात्रतेची पूर्तता पूर्ण आहे याची खात्री करा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार कागदपत्रे आणि तयारीसाठी वेळेवर उपस्थित राहा.
  • लेखी परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि ड्राफ्टिंग स्किल वर भर द्या.

शेवटच्या आणि महत्वाची सूचना

18 नोव्हेंबर 2024 रोजी 9:00 वाजता उमेदवारांनी मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी फॉर्मल ड्रेस मध्ये सर्व तयारी करून यायचे आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुंबई मध्ये TIFR या ठिकाणी नोकरी मिळणार आहे आणि Clerk Trainee च्या पदावर काम करून तुमच्या कौशल्याला एक नवा आयाम द्या!

संपर्क साधण्यासाठी

टाटा मूलभूत संशोधन संस्था, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – 400 005.

TIFR Bharti 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

  • टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील TIFR Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायची वेबसाईट उमेदवारांना जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून दिलेल्या वेबसाईट द्वारे आपल्या अर्ज करायचे आहेत.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्याकडून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ऑफलाइन पद्धत देण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थेच्या पत्त्यावर आपल्या अर्ज पत्राद्वारे किंवा कुरियर द्वारे पाठवायचे नाहीत. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करावे.
  • ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खडाखोड करायची नाही. असे करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःची संपूर्ण माहिती योग्य आणि बरोबर लिहायचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जामध्ये चुकीची माहिती लिहिल्यास आशा उमेदवारावर कारवाई करण्यात येईल.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ही आहे. या तारखेनंतर मिळालेल्या अर्ज या धरणात येणार नाहीत.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यायची आहे. आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करायची आहे. त्यापूर्वी कोणत्याही उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन भरू नयेत.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील TIFR Bharti 2024 भरती करिता पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 22000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील TIFR Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाही.
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र असणार आहेत.

Leave a Comment