TISS Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स एअरटेल भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 33 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “कार्यक्रम कार्यकारी, कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, उच्च विभाग लिपिक, कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, कार्यालय सहायक” या पदांकरिता योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. 15 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अधिक माहितीसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेला लेख वाचावा.
- 33 रिक्त जागा भरण्याकरिता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याकडून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील भरती मधून “कार्यक्रम कार्यकारी, कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, उच्च विभाग लिपिक, कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, कार्यालय सहायक” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
महाराष्ट्र सीमा शुल्क विभाग येथे नोकरीची सुवर्णसंधी.
TISS Mumbai Bharti 2024 | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे आरोग्य विभागामध्ये काम करण्याकरिता विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या संस्थेची स्थापना 1936 रोजी झालेली आहे. ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे. ही स्वयंपूर्ण विद्यापीठ असून University Grants Commission (UGC) मार्फत या संस्थेला आर्थिक पुरवठा केला जातो. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला NAAC द्वारे 3.89/4 ग्रेड मिळाला आहे आणि 2022 च्या NIRF युनिव्हर्सिटी क्रमांकामध्ये मध्ये 60 व्या स्थानावर ही संस्था आहे.
मुंबई (मुख्य कॅम्पस), हैदराबाद, गुवाहाटी, आणि तुळजापूर (ग्रामीण कॅम्पस) हे चार कॅम्पस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या आहेत. ही संस्था 5 पदवीचे कोर्स, 47 पदव्युत्तर पदवी प्रोग्राम, आणि 20 पीएच.डी. अभ्यासक्रम ऑफर करते.
हेल्थ आणि वेलनेस प्रकल्पांसाठी विविध पदांची मागणी आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ने उत्तराखंड राज्यातील सब-सेंटर्स (SHC) आणि प्रायमरी हेल्थ सेंटर्स (PHC) मध्ये परफॉर्मन्स असेसमेंट मॉनिटरिंग प्रोजेक्ट साठी खालील पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
Sr. No. | पदाचे नाव | स्थान | पदसंख्या | वेतन (INR/महिना) |
---|---|---|---|---|
1 | प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह | मुंबई/देहरादून | 1 | ₹85,000 |
2 | प्रोग्राम कोऑर्डिनेटर्स | उत्तराखंड राज्य | 1 | ₹65,000 |
3 | अकाउंटंट | मुंबई/देहरादून | 1 | ₹45,000 |
4 | अप्पर डिव्हिजन क्लर्क्स (Admin Assistants) | देहरादून | 2 | ₹35,000 |
5 | प्रोग्राम असिस्टंट्स कम फील्ड ऑफिसर्स | उत्तराखंड राज्य | 2 | ₹35,000 |
6 | फील्ड इन्वेस्टिगेटर्स | उत्तराखंड राज्य | 25 | — |
7 | ऑफिस असिस्टंट | देहरादून | 1 | ₹25,000 |
TISS Mumbai Bharti 2024 | वरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे
1. प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह:
- पात्रता: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तर पदवी हेल्थ सायन्स, सार्वजनिक आरोग्य, सामान्य विज्ञान किंवा संबंधित क्षेत्रातून उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुभव: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे प्रकल्प अंमलबजावणीचा 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- कुशलता: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे चांगले लेखन आणि चांगले वक्तृत्व असणे आवश्यक आहे.
जवाबदाऱ्या:
- प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असताना जिल्हा टीमला सहकार्य करणे.
- चालू प्रकल्पाचे मासिक अहवाल बनवणे.
- प्रकल्पासंदर्भात सरकारी आणि खासगी शेअर होल्डर्स सोबत संवाद साधणे.
2. प्रोग्राम कोऑर्डिनेटर्स:
- पात्रता: सदरील TISS Mumbai Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून मास्टर्स डिग्री (Health Sciences, Public Health, Social Sciences किंवा संबंधित क्षेत्रात) उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुभव: अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे प्रकल्प अंमलबजावणीचे तीन वर्षाचा अनुभव असावा.
- कुशलता: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे लेखन आणि संभाषण कौशल्य चांगली असणे आवश्यक आहे.
जवाबदाऱ्या:
- नियुक्त उमेदवारांनी ब्लॉक लेव्हल संघासाठी प्रशिक्षण, निरीक्षण, आणि प्रकल्पाचे मूल्यमापन करणे.
- मासिक प्रगती अहवाल तयार करून सादर करणे.
3. अकाउंटंट:
- पात्रता: सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कॉमर्स आणि अकाउंट या विषयांमधून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुभव: अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे प्रकल्पाच्या वित्त व्यवस्थापनाचा दोन वर्षाचा अनुभव असावा.
जवाबदाऱ्या:
- नियुक्त प्रकल्पाचा आर्थिक अहवाल तयार करणे.
- जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवर निरीक्षण ठेवणे.
4. अप्पर डिव्हिजन क्लर्क्स (UDC):
- पात्रता: सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
- अनुभव: अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दोन वर्ष ऑफिस व्यवस्थापनाचा अनुभव असावा.
जवाबदाऱ्या:
- पदावर नियुक्त उमेदवारांनी ऑफिस व्यवस्थापन आणि प्रशासनातील दैनिक कामे पाहणे आवश्यक आहे.
- प्रकल्प व्यवस्थापनात संदर्भातील फायली आणि डेटा व्यवस्थित ठेवणे.
5. प्रोग्राम असिस्टंट्स कम फील्ड ऑफिसर्स:
- पात्रता: पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- अनुभव: पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दोन वर्ष प्रकल्पअंमलबजावणीचा अनुभव असणे गरजेचे आहे.
जवाबदाऱ्या:
- जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर प्रकल्पाचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करणे.
6. फील्ड इन्वेस्टिगेटर्स:
- पात्रता: अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही क्षेत्रातील बॅचलर पदवी असावी.
- अनुभव: या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा संबंधित कामात दोन वर्ष फिल्ड वर्क चा अनुभव असावा.
जवाबदाऱ्या:
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ब्लॉक स्तरावर डेटा गोळा करणे आणि रिपोर्ट तयार करणे आवश्यक आहे.
- प्रकल्पातील महत्त्वाची कामे पार पाडणे आवश्यक आहे.
7. ऑफिस असिस्टंट:
- पात्रता: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
- अनुभव: अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दोन वर्षाचा ऑफिस मॅनेजमेंट चा अनुभव असावा.
जवाबदाऱ्या:
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफिसमधील दैनंदिन कामे करून टीमला सहकार्य करावे.
इतर महत्वाच्या अटी आणि नियम:
- TISS Mumbai Bharti 2024 या भरतीमध्ये उमेदवाराचे वय अनुभवाच्या आधारावर शिथिल करण्याचा पूर्णपणे अधिकार प्रकल्प व्यवस्थापन टीमला आहे.
- सदरील TISS Mumbai Bharti 2024 भरती मध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA मिळणार नाही.
- अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी चुकीची माहिती द्यायची नाही. चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- 15 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- सदरील भरती मधून पदावरनिवड झालेल्या उमेदवारांना 15 दिवसांत कामावर रुजू व्हावे लागेल.
अर्ज करण्यासाठी लिंक:
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया:
- मिळालेल्या अर्ज मधून योग्य अर्ज निवडले जातील निवड झालेल्या अर्जामधील उमेदवारांना लेखी परीक्षा आणि व्यक्तिगत संवादासाठी बोलावण्यात येईल.
- TISS Mumbai Bharti 2024 या भरतीची निवड प्रक्रिया मुंबई/देहरादून येथे प्रक्रिया पार पडेल.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज पाठवायचे नाहीत.
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांनी सगळी माहिती अचूक आणि बरोबर लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.