UPSC ESE Bharti 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत 232 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

 UPSC ESE Bharti 2024 केंद्रीय लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 232 रिक्त जागांकरिता सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोंबर 2024 ही आहे. सदरील भरती मधून ” स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी ” या जागांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 232 रिक्त जागांकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा अंतर्गत भरती होणार आहे. लोकसेवा आयोग ईएसई परीक्षेचे अंतर्गत होणाऱ्या वैद्यकीय चाचणी संदर्भात माहिती खालील प्रमाणे.
  • लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा अंतर्गत होणाऱ्या भरती मधून ‘स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,  भरती

UPSC Bharti 2024 | लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, नियम व अटी खालीलप्रमाणे.

  •  UPSC ESE Bharti 2024 या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असावे.
  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 30 वर्षापर्यंत असावे. अर्ज करणारा उमेदवार 2 जानेवारी 1955 च्या अगोदर जन्मलेला नसावा किंवा 1 जानेवारी 2004 नंतर जन्मलेला नसावा.
  • सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, इंडियन नेव्ही, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसेस, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डिपार्टमेंट & गंगा रिजूनिवेशन, सेंट्रल वॉटर कमिशन, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आंत्रप्रेन्यूयर शिप, मिनिस्ट्री ऑफ MSME या शाखांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
  • तात्पुरत्या स्वरूपाने आणि नियमित रूपाने कामावर असलेल्या संबंधित शाखेतील कामगारांना वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येईल.
  • SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल. OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्ष सूट देण्यात येईल.
  • युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या सैनिकांना वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येईल.
  • सैन्यदलामध्ये 1 जानेवारी 2025 रोजी सुरुवातीची पाच वर्षे पूर्ण केलेल्या उमेदवाराला वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
UPSC ESE Bharti 2024
UPSC ESE Bharti 2024
  • ज्या उमेदवारांना डोळ्याने कमी दिसणे, ऐकायला न येणे किंवा कमी येणे, लोकोमोटर असक्षमता आशा उमेदवारांना वयामध्ये 10 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
  • सदरील  UPSC ESE Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकी पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेक्शन A & सेक्शन B या परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असाव्यात.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त फॉरेन विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था मधून अभियांत्रिकी पदवी / पदविका उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
  •  UPSC ESE Bharti 2024 अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधून पदवी मेंबरशिप एक्झाम उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मेंबरशिप परीक्षांमधील पार्ट II & पार्ट III / सेक्शन A & B परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली पाहिजेत.
  • इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ इंजिनिअरिंग संस्थान, लंडन यांच्यामार्फत घेण्यात येणारी नोव्हेंबर, 1959 नंतरची परीक्षा उमेदवारांनी पास केलेली असणे आवश्यक आहे.
  • इंडियन नेव्ही मधील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.Sc पदवी वायरलेस कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक, रेडिओ फिजिक्स किंवा रेडिओ इंजिनिअरिंग विषय घेऊन उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • इंडियन रेडिओ रेग्युलेटर सर्विस मान्यताप्राप्त संस्थेमधून एमएससी पदवी वायरलेस कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ फिजिक्स किंवा रेडिओ इंजिनिअरिंग विशेष विषय घेऊन उत्तीर्ण केलेली पाहिजे. किंवा उमेदवाराने मास्टर डिग्री विज्ञान सोबत फिजिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा टेलिकम्युनिकेशन मधून उत्तीर्ण केलेली असावी.

UPSC Bharti 2024 | लोकसेवा आयोग ईएसई परीक्षेचे अंतर्गत होणाऱ्या वैद्यकीय चाचणी संदर्भात माहिती खालील प्रमाणे.

  • उमेदवाराची निवड फायनल झाल्यानंतर त्या उमेदवाराला इंजीनियरिंग सर्विस एक्झामिनेशन – 2025 अंतर्गत वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
  • सदरील  UPSC ESE Bharti 2024 भरती मधील पदांकरिता सुदृढ आणि निरोगी व्यक्ती मिळवण्याकरिता उमेदवाराची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे.
  • इंजीनियरिंग सर्विस एक्झामिनेशन 2025 च्या नियमानुसार उमेदवाराची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
  • खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सदरील भरतीसाठी ₹ 200 फी लागणार आहे. उमेदवारांनी ही फी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जमा करावी. किंवा विजा कार्ड / मास्टर कार्ड / रूपे क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / यूपीआय पेमेंट यांच्याद्वारे किंवा नेट बँकिंगच्या द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांना रोख रकमेत फी भरायची आहे आशा उमेदवारांनी ” Pay By Cash ” हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर कॅश भरायचा स्लिप ची प्रिंट काढायचे आहे. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कामकाजाच्या दिवशी बँकेमध्ये कॅश भरायची आहे. 7 ऑक्टोंबर 2024 रोजी रात्री 12:00 वाजता “Pay By Cash” पर्याय बंद होईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जाची फी वरील दिलेल्या स्वरूपात भरायचे आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या पद्धतीने उमेदवाराला फी भरता येणार नाही. फि न भरता जमा केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील  UPSC ESE Bharti 2024 भरतीसाठी भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला परत माघारी देता येणार नाही. किंवा जमा केली फी इतर कोणत्याही परीक्षे करिता वापरता येणार नाही.
  •  UPSC ESE Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा फी भरल्याचा पुरावा बँकेकडून संस्थेला मिळाला नाही तर त्या उमेदवाराला सुरुवातीला बाद करण्यात येईल. आशा उमेदवारांची लिस्ट अर्ज भरायच्या शेवटच्या तारखेनंतर दोन आठवड्यांमध्ये लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जाची फी भरलेल्या उमेदवाराला फी भरल्याचा पुरावा 10 दिवसाच्या आत मध्ये सादर करावा लागणार आहे. पुरावा सादर करताना उमेदवारांनी समक्ष उपस्थित राहून किंवा स्पीड पोस्टद्वारे आयोगाकडे पाठवायचा आहे.
  • महिला / SC,ST / अपंग या प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी सदरील भरती करिता द्यावी लागणार नाही. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संपूर्ण फी भरावी लागेल.

UPSC Bharti 2024 | लोकसेवा आयोग ईएसई अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाईट द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सुरुवातीला पोर्टलवर वन टाइम रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात करायचा आहे.
  • वन टाइम रजिस्ट्रेशन हे एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात फक्त एकदाच करायला येणार आहे. ज्या व्यक्तीने अगोदरच रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांनी थेट अर्ज भरायला सुरुवात करावी.
  • जर कोणत्याही उमेदवाराला वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये बदल करायचा असेल तर त्या उमेदवारांना आयुष्यात फक्त एकदाच बदल करता येईल. संपूर्ण वर्षात कधीही उमेदवार हा बदल करू शकतो. सदरील वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये बदल करायचा असेल तर उमेदवारांनी अर्ज करायच्या शेवटच्या तारखेनंतर सात दिवसाच्या आत मध्ये बदल करायचा आहे. सदरच्या परीक्षेसाठी उमेदवार जर पहिल्यांदाच अर्ज करत असेल तर त्या उमेदवारा करिता वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये बदल करायची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 राहील.
  • उमेदवाराला भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर अर्जात बदल करायची संधी सुद्धा आयोगाने दिलेली आहे. अर्ज करायच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज करायचे प्रणाली बंद झाल्यानंतर. सात दिवसाच्या आत मध्ये उमेदवार अर्जामध्ये बदल करू शकतात.
  • 9 ऑक्टोंबर 2024 ते 15 ऑक्टोंबर 2024 यादरम्यान उमेदवार वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये बदल करू शकतात. त्याचप्रमाणे अर्जामध्ये बदल करायचा ठिकाणी उमेदवाराला वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये बदल करता येणार नाही.
  • कोणत्याही उमेदवाराने एकदा अर्ज जमा केल्यानंतर त्याला तो अर्ज पुन्हा माघारी घेता येणार नाही.
  • सदरील भरती करिता कोणत्याही उमेदवाराला फक्त एकाच पदाकरिता अर्ज करता येणार आहे. काही परिस्थितीत उमेदवाराने जर दोन पदाकरिता अर्ज केला तर दुसऱ्या पदासाठी केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सरकारी कर्मचारी, सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील कर्मचारी, किंवा समतुल्य संस्थांमधील कर्मचारी, खाजगी कर्मचारी येथील उमेदवारांनी थेट आयोगाकडे अर्ज करावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वयाचा दाखला, शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेले प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
  • जर कोणत्याही उमेदवाराने खोटे कागदपत्र सादर केले तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

UPSC Bharti 2024 | लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा मार्फत होणाऱ्या भरतीसाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा मार्फत होणाऱ्या भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा मार्फत होणाऱ्या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राबविण्यात आलेली नाही.
  • सदरील UPSC ESE Bharti 2024 भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरत असताना बरोबर भरायचा आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास त्या उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येऊ शकतो.
  • या  UPSC ESE Bharti 2024 भरती करिता 8 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील UPSC ESE Bharti 2024 भरती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
  • पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केल्यास त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

Leave a Comment